गीत : घेतला भिमानं बदला
शब्द: प्रितेश मांजलकर
गायक: प्रवीण डोणे
संगीत: प्रवीण - प्रितेश
निर्मिती-सिद्ध आर्ट
नृत्य दिग्दर्शन-सुशांत जाधव
व्हिडिओ दिग्दर्शन -सुभाष-संदेश
एकटाच उतरला शड्डू ठोकूनी ,शिकावंस हे भिडनं
तो पेटून उठला , गर्जत सुटला ,मार्ग शोधूनी मधला
मग भारत सजला-नटला ,घेतला असा भीमानं बदला...
प्राध्यापक बनला तरी ना सोडली अस्पृश्यतेने पाठ
विद्यादानाचे कार्य महान पण स्पर्शू ना शकला माठ
पाण्या म्हणती ते जीवन, पण त्यांनी नासवले हेजीवन
उर्जामंत्री बनूनी सुजलाम केलं इथलं जल जन जीवन
दामोदर ,हिराकुंड ,सोन उभारला ओडिसा,बिहार, बांगला
मग भारत सजला-नटला ,घेतला असा भीमानं बदला...||१||
उच्चशिक्षित तरीही सहकाऱ्यांनी कधी ना दिला सन्मान
जातीवाचक शेरेबाजी सदोदीत सहन केला अपमान
मुक्त होऊ पाहे सदा तो , जात घेऊनी येई बंधन
पण मंत्री बनूनी केले दूर कामगारांचे घोर रुदण
कष्टाळूंच्या पेंशन पीएफ डीए सन्मानासाठी तो लढला
मग भारत सजला-नटला ,घेतला असा भीमानं बदला.
Z
मनूस्मृती जाळूनी हिंदू स्त्रियांच्या मुक्तीचा मार्ग उघडला
मग भारत सजला-नटला ,घेतला असा भीमानं बदला.
संविधान लिहूनी प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिधला
मग भारत सजला-नटला ,घेतला असा भीमानं बदला.
देशात च राहून देशहिताचा मध्यम मार्ग निवडला
मग भारत सजला-नटला ,घेतला असा भीमानं बदला
विशेष आभार - माता रमाबाई आंबेडकर मार्ग महापालिका वसाहत
गीतकार -प्रितेश मांजलकर
संगीत संयोजन -प्रविण डोणे-जयेंद्र भांडे
कोरस -गौरा डोंगरे,सौरभ पवार,अपूर्व शिंदे,शुभम मोरे,निलेश जाधव,अक्षय मुटाटकर,शुभम कांबळे
ध्वनीमुद्रण -जयेंद्र भांडे (आदियश स्टुडिओ, चेंबूर)
तालवाद्य - महेश लोखंडे
नृत्य कलाकार -सिद्धी कोळी, अपेक्षा पावसकर,शिवानी तांबे, समृद्धी धोत्रे, तनुश्री जाधव,प्रज्ञा येलवे,सलोनी धोत्रे,शिल्पिता पालकर,दक्षता जाधव,श्रेया कांबळे,वैष्णवी पाचारकर,प्राची जाधव,स्वरांगी धोत्रे
व्हिडिओ संकलन -सुभाष नारायण
पोस्टर डिझाईन -नितीन पिंपळीसकर
2 comments
Click here for commentsKhupach chhan
Replythank you
ReplyConversionConversion EmoticonEmoticon