Mahadchya Talyach Pani lyrics in marathi महाडच्या तळ्याचं पाणी Shital Sathe Sachin Mali - shital sathe Lyrics

Singer | shital sathe |
Music | shital sathe |
Song Writer | sachin mali |
महाडच्या तळ्याचं पाणी पेटलं गं बाई
त्या तळ्यांत माझ्या भिमाची छबी भेटलं गं बाई...धृ
माई गं माझे माई रमाई आई गं
माई गं माझे माई रमाई आई गं...
भीम नावाचं इवल रोप दारी लावीन गं
त्या रोपाचा बोधीवृक्ष आभाळी जाईल गं
माई गं माझे माई रमाई आई गं
माई गं माझे माई भिमाई आई गं...
माती कसणाऱ्या तुक्याचा अभंग होईन गं
समतेच्या युगाचं चाक म्होरं जाईल गं
माई गं माई माझी रमाई
माई गं माई माझे भिमाई...
मुक्याला बोल देईन गाण्याला सूर गं
मूकनायकाच्या शब्दाला धार येईल गं
माई गं माई माझी रमाई
माई गं माई माझे भिमाई...
नालंदाच्या ज्ञान झऱ्यांना शोधीन गं बाई
उजेडाच्या लाखो लेण्या घडवीन गं बाई
माई गं माई माझी रमाई
माई गं माई माझी रमाई...
एकतारी वर जागर घाली कबीर दोहा गं
त्या दोह्याच्या शब्द-सुरांचं लेणं लेईन गं
माई गं माझे माई रमाई आई गं
माई गं माझे माई भिमाई आई गं...
स्वातंत्र्याच्या लाखो ज्योती हृदयी लावीन गं
त्या ज्योतीच्या उजेडात मी न्हाऊन जाईन गं...
माई गं माई माझी रमाई
माई गं माई माझे भिमाई...
भीमा तुझ्या निळाईची मी ओवी गाईन गं
समतेच्या त्या रणांगणाची निशाणी होईन गं..
माई गं माई माझी रमाई.
माई गं माई माझे भिमाई...
ConversionConversion EmoticonEmoticon