marathisonglyrics

Bhiman Manula Jalala Lyrics sachin mali, singer shital sathe , madhur shinde भीमानं मनूला जाळला

Bhiman Manula Jalala भीमानं मनूला जाळला - shital sathe , madhur shinde Lyrics

SingerShital Sathe , Madhur Shinde
ChorusKumar Jadhav, Shivani Kadam Aditi Pawar Vishal Parde Kailas Bagal Aniket Mohite
MusicShital-Aniket
Song WriterSachin Mali 

मानवतेशी वैऱ्यावाणी खेळला
म्हणून भिमानं मनूला जाळला...
त्या मनूनं अंधार पाळला
म्हणून भिमानं मनूला जाळला...

मनू बायांचा दुश्मन
रूढीचं घाली बंधन
म्हणे पायातली वहाण
तिची पायातच शान...

विधवेला घालवा सती
करून टाका तिचं मुंडन
मढ्यावरती चढवा मढं
चितेवरी झोपवा गाढ...

बाई विहिरीच्या काठाला रडं
हुंदक्यानी भरलं आडं
थंडगार पडल धडं
काळवंडल हिरव झाडं

आया बायांचा अक्रोश कळला
म्हणून भिमानं मनूला जाळला
मानवतेशी वैऱ्यावाणी खेळला
म्हणून भिमानं मनूला जाळला...

आई बाईला घेरतो मनू
अब्रुशी खेळतो मनू
जिता माणूस जाळतो मनू
शिवा शिव पाळतो मनू...

धेड धेड म्हणतो मनू
पाणवठ्यावर नडतो मनू
गावाबाहेर काढतो मनू
वरात अडवतो मनू...

दंड सुनावतो मनू
बंड शमवतो मनू
गुंड धाडतो मनू
धिंड काढतो मनू

मनुस्मृतीचा जुलूम कळला
म्हणून भिमानं मनूला जाळला
मानवतेशी वैऱ्यावाणी खेळला
म्हणून भिमानं मनूला जाळला...

जाती-पातीच्या नावानं कस रूजल जहरी वाणं
मनूनं लिवली पोथी न माणसाला ठिवलं गहाणं
कुणाच्या वाट्याला मान कुणासाठी घोर तो अपमान
कळसाला असावं बामनानं पायरीनं रहावं शुद्रानं

उतरंड पाळ धर्मानं
भोग भोगा सारं कर्मानं
गत जन्माची पाप
घाण या जन्मी फेडा व्याजानं

त्या मनूनं जीव लय गाळला
म्हणून भिमानं मनूला जाळला
मानवतेशी वैऱ्यावाणी खेळला
म्हणून भिमानं मनूला जाळला...

पेपरामधी दिसतो मनू
टि.व्ही. त हसतो मनू
विद्यापीठी बसतो मनू
बुकामधी घुसतो मनू...

स्टेटस बदलतो मनू
व्हायरल होतोया मनू
टिवटिवाट करतो मनू
चिवचिवाट मारतो मनू...

रोल बदलतोया मनू
ट्रोल करतोय मनू
भक्त बनवतोय मनू
रक्त मागतोय मनू...

नव्या मनूचा अवतार कळला
म्हणून भिमानं मनूला जाळला
मानवतेशी वैऱ्यावाणी खेळला
म्हणून भिमानं मनूला जाळला...

त्या मनूनं अंधार पाळला
म्हणून भिमानं मनूला जाळला...
उजेडाचा मार्ग आता कळला
मोर्चा भिमाच्या वाटन वळला...

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts