गाणं : भीमा तूझ बाळ आता झाल रे गुलाम पुन्हा
शब्द : शाहीर विजायानंद जाधव
गायक : शाहीर चरण जाधव
लागला करायला झुकनी
सलाम पुन्हा भीमा तूझ बाळ आता झाल रे गुलाम पुन्हा
नाव तुझे घेई पण कालचा तो धूर नाही
तुझ्या रांनामध्ये राबणारा धूर नाही
बोलक्या जिभेवरी लागला लगाम पुन्हा
भीमा तूझ बाळ आता झाल रे गुलाम पुन्हा
तुझ्या त्या चळवळीची राखरंगोळी केली
सिंहावाणी डरकाळीची बंद आरोळी झाली
कावळे कालचे झाले बेलगाम पुन्हा
भीमा तूझ बाळ आता झाल रे गुलाम पुन्हा
ConversionConversion EmoticonEmoticon