गाणं : ये भाकरीचे माई
शब्द: सचिन माळी
गायक : शीतल साठे
एल्बम : समता सांगराची गाणी
संगीत प्रयोजन : प्रवीण डोणे
ये भाकरीची माई ये दुधाचे आई
तू बोलत का न्हाई मन खोलात का न्हाई गं ..
माये गं..
रोज शेताचा तू बांध तुडविला
धारणीच्या पोटात सूर्य उगविला
चिव चिवत्या पाखरांना घास भरविला
मोडक्या संसाराचा गाडा चालविला गं..
ये कष्टाचे आई ये सूर्याचे आई
तू बोलत का न्हाई मन खोलात का न्हाई गं ..
माये गं..
रक्त बंबाळ भुकनं मळवट सारविला
वासनेच्या पुजऱ्यानं भाळ चिरविला
पायातल्या वहाणा करून सस्ता मिरविळा
युगांच्या उंबऱ्यावर बळी चढविला गं ..
ये शतकांचे माई ये युगांचे आई
तू बोलत का न्हाई मन खोलात का न्हाई गं ..
माये गं..
सवासणीच्या आगीत तुला उभ जाळलं
आकांतांच्या ओव्यांनी काळीज फाडलं
हंबरडा फोडला शब्दांनी सारे पाझर आळले
मुक्या आत्मचरित्राचे कुणी डोळे फोडले (२)
ये शब्दांचे आई ये स्वप्नांचे माई
तू बोलत का न्हाई मन खोलात का न्हाई गं ..
माये गं..
बोल गं तू बोल माई
काळीज तू खोल माई
बोल गं तू बोल माई
काळीज तू खोल माई
तुझ्या वेदनेच धाराण तू फोड गं माई
जालीम ही व्यवस्था तू मोड गं माई (२ )
ये भाकरीचे माई दुधाचे माई
तू बोलत का न्हाई मन खोलात का न्हाई गं ..
माये गं..
ConversionConversion EmoticonEmoticon