गाणं : मांगानं आता जागावं
गायक : मिलिंद शिंदे , शीतल साठे
पार्श्वगायक : कुमार जाधव , शिवानी कदम, बाबासाहेब आतखिळे, तुषार सुतार , विशाल पारडे ,
अनिकेत मोहिते
शब्द : शीतल साठे, सचिन माळी
जिणं गुलामीचं हे त्यागावं
मांगानं आता जागावं, अन लहुजी वाणी वागावं
लहू जोतीचा पाठीराखा
घेतो समतेच्या आणाभाका
ज्ञान बंदी उठवली लेका
त्यानं पत्करून धोका
वारसा महान जी, जीव की प्राण जी
भान साऊ जोतीकडं मागावं
मांगानं आता जागावं, अन लहुजीवाणी वागावं
मुक्ताचा सवाल काय?
अजून समजला का नाय?
मांग उगाच करतोय वाय
धर्मवादयांच्या पाठी जाय
वाट सोडा जी, रूतला गाडा जी
अंग झाडून बाहेर निघावं
मांगानं आता जागावं अन मुक्तावाणी वागावं
देई राणोजी जोगणीचा मान
घेई फकिरा स्वातंत्र्याची आन
बंधू सत्तूचा वाचवी प्राण
धान वाटलं समान
फिरतो रानं जी, ताठ मान जी
नावापुढं राष्ट्रवीर लागावं
मांगानं आता जागावं अन फकिरावाणी वागावं
जगी उंच अण्णाचा माथा
आज त्याचीच वाचावी कथा
दूध वाघिणीच हे पिता
गुरगुरले मांगाचे छावे आता
घ्यावा धडा जी, चला भिडा जी
बळ अण्णाभाऊंकडं मागावं
मांगानं आता जागावं अन अण्णाभाऊवाणी वागावं
मांग पेटून उठलाय सारा
बाळासाहेबांचा पाहून दरारा
सत्ता येईल आपल्या दारा
सासन एकीचं उभारा
झेंडा निळा जी, जोडा पिवळा जी
साऱ्या रंगाचं झेंड लागावं
रान मांगच हे जागावं अन भीमाच्या चरणी लागावं
ConversionConversion EmoticonEmoticon