marathisonglyrics

Elgar kavita kavi suresh bhatt एल्गार कवि : सुरेश भट्ट

एल्गार 

कवि : सुरेश भट्ट 

 अद्यापही सुऱ्याला माझा सराव नाही 

 अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही 


 येथे पिसून माझे काळीज बैसलो मी .. 

आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही 


हे दुःख राजवर्खी .. ते दुःख मोरपंखी .. 

जे जन्मजात दुःखी कोठेच धाव नाही ?? 


त्यांना कसे विचारू - कोठे पहाट गेली ?

त्यांच्यापल्याड त्यांची कोठेच धाव नाही 


जी काल पेटली टी बस्ती मुजोर होती 

( गावात सज्जनांच्या आता तणाव नाही ) 


झाले कुठे फरारी संतप्त राजबिंडे? 

कोठेच आसवांच्या बाका बनाव नाही 


गर्दीत गारड्यांच्या सामील रामशास्त्री 

मेल्याविना मढयाला आता उपाव नाही 


जावे कुण्या ठिकाणी उद्ध्वस्त पापियांनी ? 

( संतांतही      घराच्या  राखेस भाव नाही ! ) 


उच्चारणार नाही कोणीच शापवाणी..

तैसा हृषीमुनींचा लेखी ठराव नाही !


सध्याच माणसांचा एल्गार येत आहे .. 

हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही !


ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे 

अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही 

Previous
Next Post »

Popular Posts