नाव : माझी माय
शब्द : शीतल साठे
माझी माय
कशी दारुड्याची धुरा मायच्या खांद्यावर आली
तिचे डोळे पाणावले ,नाही एकदा हसली माझी माझी माय
पेटे पोटात या भूक नाही भेटे रे भाकर तिचे इवलेसे बाळ
हिंडतेय दरोदार माझी माय
तिला बिलगता जीव माझा होई कासावीस
तिच्या घामाला सुटते सदा अत्तराचा वास माझी माय
वासनेच्या पूजऱ्याची मायवरती नजर
तिचे उघडे ते अंग झाकतेया ती पदर
माझी माय
बाप रोज दारू पिते माय उपाशी झोपते
माय मोळ्या ती बांधते माय काड्या ती फोडते
माझी माय
माय भांडी ती घासते माय धुनी ती धूवते
माय भाकर बनवते माय घास भरवते माझी माय
माय पोटती ती जाळते बापू शिक रे म्हणते
मोठा साहेब हो म्हणते बाबासाहेब हो म्हणते
माझी माय
ConversionConversion EmoticonEmoticon