Song : Olya
Sanjveli
Album : Premachi
Goshta
Singer : Swapnil
Bandodkar, Bela Shende
Artist : Atul
Kulkarni, Sagarika Ghatge
Video Director :
Satish Rajwade
Music Director :
Avinash & Vishwajit Joshi
गाण : ओल्या सांजवेळी
चित्रपट : प्रेमाची गोष्ट
गायक : स्वप्नील बांदोडकर , बीका शेंडे
कलाकार : अतुल कुलकर्णी , सागरिका घाटगे
संगीत : अविनाश आणि विश्वजित जोशी
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा ...
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना ...
आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा ...
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना ...
सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया...
माझी ही आर्जवे, पसरून काजवे,
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या ...
रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे,
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत तुझी साथ दे ...
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा ...
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना ...
वळणावरी तुझ्या, पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे ...
डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी,
ओळख आता खरी होऊन जाऊ दे ...
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला,
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला...
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा ...
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना ...
ConversionConversion EmoticonEmoticon