जात
Concept and Singer : Avadhoot Gupte
Lyrics: Sameer Samant
Music Produced by : Vikram
Director : Sandesh Lokebgaonkar
Associate Director : Subhas Narayan
गायक : अवधूत गुप्ते
शब्द: समीर सामंत
जात.. ही जात.. शे.. .
दोन डोळे दोन कान, दोन हातपाय..
याच्याकडे काय आहे जे, त्याच्याकडे नाय..
एक माथा एक नाक, एक पोट एक भूक
एक मेंदू एक थॉट... "साला माझी काय चूक?"
एक दाबलेलं तोंड.. एक मारलेलं मन..
एक वाकलेली पाठ.. तिथे पिढीजात वण
याची मान इथे ताठ.. त्याला मान नाही शाट
याला त्याला दूरठेवी.. साला याची त्याची जात
एकमेकांसाठी मग शिवी शिवाय बात नाही
जात नाही जात नाही जात जाता जात नाही
राजे राजवाडे गेले वझीर -नबाब गेले
शाहसुलतान गेले साहेबीरुबाब गेले
पंत गेले राव गेले मिशांवरले ताव गेले
भलेभले आलेगेले त्यांचे नावगाव गेले
गेल्यागेल्या शेंड्याआणि जानव्यांच्या गाठी गेल्या
घटका गेली पळे गेली रुढी पाठीपाठी गेल्या
तरी पण कुठेतरी खोलखोल आतआहे
घोटभर पाणी आणि सावलीलाही जात आहे
अजूनही गावीखेडी एकच कहाणी आहे
वाटलेल्या विहीरी नी बाटलेलं पाणी आहे
ह्येच्या घरची गंगा त्येच्या दारी नाही
जात साली जात साली जात जाता जात नाही
काय झालं काय झालं खरं सांगा काय झालं?
तिथं सुख मोप झालं.. हिथं काय नाय झालं ?
समित्यात कमिट्यात लय खरंखोटं झालं
मरतुया.. मरूद्यात.. त्यात काय मोठं झालं ?
आम्हालाबी मन हुतं.. सांगा त्याचं काय झालं?
एकलव्याच्या कापल्या अंगठ्याचं काय झालं ?
गटारातल्या अंगभर दलदलीचं काय झालं ?
नेते मोठे झाले पण... चळवळीचं काय झालं ?
विकासाचं जाऊ द्यात.. दंगलीचं काय झालं ?
सांगा मालक सांगा मारुती कांबळीचं काय झालं ?
सोराज्याचं ठीक पण सुराज्याचं काय झालं ?
जातीची सवय झाली.. आजादीचं वय झालं..
रोज साली शिवीगाळ, बहिष्कार, अत्याचार
झुंडबळी मारझोड, नंगीधिंड, बलात्कार
डोसक्याचा भूगा हुतो.. अंगांगाचा हुतो जाळ
आसवांच्या रगताने डोळे होतात लाल लाल
किती धर्म किती जाती त्यात साल्या पोटजाती
च्यायला या जातीपायी खाक झाली सगळीनाती
जेच्या तेच्या जातीचाच जेला तेला माज हाय
जाती पायी नासल्येला समदा समाज हाय
सांगा काय मोठं असं ठेवलं या जातीमंदी
मातीतून आलो सारे जाणारच मातीमंदी
शेवटाचं सांगायलोय नीट राहुदे ध्येनात
माणसं आहुत सारी माणूसकी हीच जात
याच्याबिगर कोणतीबी वळख जगात नाही
जात साली जात साली जात जाता जात नाही
जन्मामध्ये जात साली मरणा मध्ये जात
शिक्षणात जात साली लग्नामध्ये जात
नोकरीत आरक्षणात बदल्यांमध्ये जात
घरीदारी भोवताली सगळ्यांमध्ये जात
सरकारी नोंदीमध्ये टक्क्यांमध्ये जात
शासकीय दाखल्याच्या शिक्क्यांमध्ये जात
काळ्याकुट्ट इतिहासाच्या पानोपानी जात
अजूनही समाजाच्या ध्यानी-मनी जात
एक गठ्ठा व्होटिंगच्या वायद्यासाठी जात
ज्याला त्याला हवी साली फायद्यासाठी जात
हितंतिथं आजूबाजू जागोजागी ठाईठाई
जीव जाता जातूया पन जात काही जात न्हाई
जात नाही जात नाही जात जाता जात नाही ..
ConversionConversion EmoticonEmoticon