वारा विषमतेचा र लय सुटला भयाण
Singer | charan jadhav |
Lyrics | charan jadhav |
कस डुलाव डुला नं कस फुलाव फुलानं
वारा विषमतेचा रं लय सुटला भयाण
कोण लपून बसला र वावटलीत भयाण
कोण पेरीत चालला ग्याॅड जातीची र घाण
कोण आपलेच राहावे फिरवी धर्माची गोंफाण
कस डुलाव डुला नं कस फुलाव फुलानं
वारा विषमतेचा रं लय सुटला भयाण
इथ न्याय दिला जातो आमच्या जाती बघून
खोतमांगे संपला न्याय माघून माघून
कधी सुटलं र त्याच हे न्यायच गिराण
वारा विषमतेचा रं लय सुटला भयाण
यो जातीचा डोंगुर कोण्या मांजिन फोडावा
सारे माणूस होऊन पांग देशाचा फेडावा
तथागतांच्या मार्गानं करू जागाच कल्याण
वारा विषमतेचा रं लय सुटला भयाण
कस डुलाव डुला नं कस फुलाव फुलानं
वारा विषमतेचा रं लय सुटला भयाण
ConversionConversion EmoticonEmoticon