उधळू दे वारू
Song : Udhalu de varu
Singer : Pravin Done
Lyrics & Composer:
Pritesh Manjalkar
Director
: Pradeep Shivgan
Ass. Director-
Hrishikesh Lanjekar
Studio : Phonix Studio, Mumbai
Movie : Bhovani
गाण :उधळू दे वारू
गायक :प्रवीण डोणे
शब्द : प्रितेश मांजलकर
दिग्दर्शक :प्रदीप शिवगण
चित्रपट:भोवनी
उधळू दे वारू असा चौफेर चौखूर
जाळून टाक भय गंडाचे काहूर
रीती नीतीची पायी बेडी नसावी
बेभान जगण्याची कमी नसू दे
दडवुनी ठेविल्या तू,भावना साऱ्या त्या उधळून दे
वर्षाव प्रेमभरा ह्रदयात, ओठात कवळून घे
गुलाबी वारे,देती शहारे प्रेमाची अनुभूती जवळून घे
तुझ्यात ती अन् तिच्यात तू अशी प्रेमाची गोडी जुळवून घे
दडवुनी ठेविल्या तू,भावना साऱ्या त्या उधळून दे
प्रेमाच्या रंगात रंगून जा तू,
ध्यानी मनी तुझ्या प्रेम वसू दे
उधळू दे....
समजून जा उमजून घे खोट्या मुखवट्यांची दुनिया इथे
हरखू नको पारखून घे दिसती चमत्कार किमया जिथे
सावध होऊन चौकस राहून टाळ दशा
बेधुंद बेबंद जगण्याची आहे निराळी नशा
कैफात साऱ्या ह्या चिंता कशाची
बोभाटा होऊ दे नांगी डसू दे...

ConversionConversion EmoticonEmoticon