कठीण होत आहे नारायण सुर्वे वाचक स्वर: संदेश लोकेगावकर
Reader | वाचक स्वर: संदेश लोकेगावकर |
Poet Writer | नारायण सुर्वे |
दररोज स्वतःला धीर देत जगणे
कठीण होत आहे
किती आवरावे आपणच आपणाला
कठीण होत आहे.
भोकांड पसरणाऱ्या मनास थोपटीत झोपून येतो.
भुसा भरलेले भोत दिसूनही थांबणे
कठीण होत आहे.
तडजोडीत जगावे. जगतो दररोज
कठीण होत आहे.
आपले अस्तित्व असूनही नाकारणे
कठीण होत आहे.
समजवून समजावतो, समजावूनही नच मानलो
कोठारात काडी न पडेल हमी देणे
कठीण होत आहे
ConversionConversion EmoticonEmoticon