गाणं : धन्य ते महात्मा ज्योतिबा फुले
गायक : अभिषेक वैशंपायन
शब्द : अशोक पवार ( जादूगार)
संगीत : अभिषेक वैशंपायन
सहगायक: श्री वैशंपायन , हृषिकेश मोरे, प्रवानंत तांबे, मानव पालकर, अनिकेत घायतडके, शुभम मोरे, नम्रता काळसेकर, निकिता गायकवाड, साक्षी शिरगावकर
त्यात बोलके सुधारक तर काही राजकारणी होते
सत्यशोधक होती ज्यांची दूरदृष्टि
असे महात्मा ज्योतिबा फुले अग्रस्थानी होते
दिशा हिन झालेल्या बहुजनांसाठी
पानी केले खुले, ज्यांनी पानी केले खुले
धन्य ते बहुजनांचे नेते
महात्मा ज्योतिबा फुले
पहिले वाहिले शिवरायांचे लिहिले गुणगान
विज्ञानवादी सत्यशोधक मिळविला मान
शूद्रांती शूद्रांना दखिवले औदार्य
ज्योतिबा फुलेंचे महान हे कार्य
जात, कुळी, देवांच्या विरोधात
उगवली त्यांनी मळे
धन्य ते बहुजनांचे नेते
महात्मा ज्योतिबा फुले
ज्योतिबांच्या विचारांची ही नव प्रभात
सावित्रींना शिक्षण देऊन केली सुरुवात
महिलांच्या शिक्षणाची केली खुली वाट
जातिभेदाचा त्यांनी केला नायनाट
केला नायनाट, केला नायनाट
बहुजनांच्या जीवनाचे ते एकमेव
मुक्ती दाता झाले
धन्य ते महात्मा ज्योतिबा फुले
ConversionConversion EmoticonEmoticon