Jay Bhim Re | जय भीम रे | Madhur Shinde | Shital Sathe| - Madhur Milind Shinde |
Singer | Madhur Milind Shinde | Shital Sathe |
Music | Shital Sathe | Aniket Mohite |
Song Writer | Sachin Mali | Shital Sathe |
नडाया भीम, पुढं भिडाया भीम...
त्या मनूला गडाया भीम रे...
बेड्या तोडाया भीम, माणसं जोडाया भीम
काळजा काळजात जयभीम रे...धृ
जोजावलं आम्हा भिमानं, आयुष्याचं देऊन दान
उंचावलं हे निळ निशाण, वाटे आम्हा त्याचा अभिमान
आमची रिंगटोन भीम, आमचा बॅकबोन भीम
धडधडतं हृदय भीम रे...
आमच्या डोळ्यांत भीम, आमच्या गळ्यात भीम
काळजा काळजात जयभीम रे...१
अन्यायाशी नाही रे सलगी, डोळ्यात बंड वाजते हलगी
विद्यापीठांमधी, ओठां-ओठांमधी
पोस्टर बॅनरमधी मायबापा...
आमच्या मोर्च्यात भीम, आमच्या चर्चांत भीम
कंठा-कंठात जय भीम रे...
आमच्या घोषणांत भीम, आमच्या भाषणांत भीम
धमन्या-धमन्यांत जयभीम रे.....२
आझादीचा देतोया नारा, संविधानाचा हा सरनामा
पाहिला आम्ही बुद्ध पुन्हा, भीमाचा हा कारनामा
आमचा टीचर भीम, फिलॉसॉफर भीम
आमच्या लढ्याचा गाईड भीम रे...
आमच्या उरात भीम, आमच्या सूरात भीम
डफा-डफावर वाजतोय भीम रे...३
उधळला वैऱ्याचा डाव, झेलुनिया जिव्हारी घाव
आम्ही मेलो तरी, कापले गेलो तरी
मुखी नाव तुझे माय बापा...
आमचा आयडॉल भीम, आमचा आयकॉन भीम
आमच्या टीमचा कॅप्टन भीम रे...
देतो ऑर्डर भीम, तोडतो बॉर्डर भीम
असा फायटर लीडर भीम रे...४
नडाया भीम, पुढं भिडाया भीम
त्या मनूला गडाया भीम रे...
बेड्या तोडाया भीम, माणसं जोडाया भीम
काळजा काळजात जय भीम रे...
ConversionConversion EmoticonEmoticon