सोडवा संविधान...संभाजी भगत
काळ्या आईच्या ऊरात भीम लेखण्या पेरतो ग माये
लेखण्या पेरतो
घेरलं ग आडरानी हामलेवार चहू कुणी
सोडवा संविधान सोडवा जनाच विधान
उगता मनू काळ जळे जुलुमाचा ग जाळ
जागे पहारे श्वासावरी कळ्या साऱ्या मरणांदारी
मनगटाच्या जोरा वरी भाजे आवळा घरावरी
कुठ शोधू लोकशाही लोक मेली उरली शाही
गेला गेला ग बाई देशाचा पराण
सोडवा संविधान सोडवा जनाच विधान सोडवा
स्वातंत्राचा रोज खून समतेची ना उरली खूण
स्वातंत्राचा रोज खून
समतेची ना उरली खूण
बंधुता दंगलीचे रान न्यायचा हरवला प्राण
बंधुता दंगलीचे रान
बंधुता दंगलीचे रान
न्यायचा हरवला प्राण
न्यायचा हरवला प्राण
आलं आलं ग बाई झुंडीला उधान
सोडवा संविधान सोडवा जनाच विधान
तुम्ही मताचे राजे मतदार बंधु सांगा
अहो सांगा अहो सांगा
अहो सांगा तुमच्या मताचा हक्क कुठून आला सांगा
तुमच्या मताचा हक्क कुठून आला सांगा
तुम्ही चालक मालक पुढारी दादा सांगा
अहो सांगा
अहो सांगा तुम्ही आमदार खासदार कसे काय झाले सांगा
तुम्ही आमदार खासदार कसे काय झाले सांगा
तुम्ही मीडियावाले पेपरवाले सांगा
अहो सांगा अहो सांगा
तुमच्या पेनात शाही कुठून आली सांगा
तुमच्या पेनात शाही कुठून आली सांगा
जर अभिव्यक्तीला नसता सुरेल गळा
अहो गळा गळा
तर फुलला असता का चॅनलवाला मळा
तर फुलला असता का चॅनलवाला मळा
तुम्ही काळ्या कोटाचे वकील दादा सांगा
अहो सांगा सांगा
तुम्ही वकिली कशी काय चालते ते तरी सांगा
तुम्ही वकिली कशी काय चालते ते तरी सांगा
तुम्ही मतदार बंधु तुम्ही सांगा
तुम्ही मतदार बंधु तुम्ही सांगा
अहो सांगा सांगा
अहो सांगा सांगा
तुम्ही पुढारी दादा सांगा
अहो सांगा सांगा
तुम्ही पेपरवाले सांगा
तुम्ही पेपरवाले सांगा
अहो सांगा सांगा
आहो वकील दादा सांगा
आहो वकील दादा सांगा
अहो सांगा सांगा
ConversionConversion EmoticonEmoticon