हे पालखीचे भोई... संभाजी भगत 
Singer | Sambhaji bhagat |
Lyrics | Sambhaji bhagat |
विषाची जिथे लावली रोपटी
त्या गावातले दूध प्यावे कसे ?
मुबारक तुला बैमानी तुझी
पंगतीला तुझ्या मी बसावे कसे ?
हवे तर तुला पाळणा तू बदल
अर्भकाचे मी आकार बदलू कसे ?
हे पालखीचे भोई यांना आईची नाही
जिथे जिंदगी जागते यांनी लेखनी पोचत नाही
राज कवि लाज रवी उजेड तुझा काय सांगू ?
राजबिंडे तुझे तांडे तोरा तुझा काय सांगू ?
अंगी वस्त्र मुख्य अस्त्र जादू त्याची काय सांगू ?
तुझा भार आमच्या डोई आम्ही पुस्तकात नाही
हे पालखीचे भोई यांना आईची नाही
अरे दिसे चंद्र देव इंद्र
अरे आमची माणसं नाही लिवली
दिसे कामिनी गजगामिनी
राबती माय नाय लिवली
दिसे पान हिरवे रान
जळती ऊन नाय लिवली
तू रंगवली दुनिया तो आमचा रंग नाही
हे पालखीचे भोई यांना आईची नाही
जिथे जिंदगी जागते यांनी लेखनी पोचत नाही
हे पालखीचे भोई यांना आईची नाही
ConversionConversion EmoticonEmoticon