जळतोय मराठवाडा - विलास घोगरे

Singer | Charan Jadhav |
Song Writer | विलास घोगरे |
अरे प्रसंग ताडा,तो हानुन पाडा
अन् जुपा एकीचा गाडा रे ..
जळतोय मराठवाडा रे,बघ जळतोय मराठवाडा रे
कोणी कांबळे पोचीराम पोट भरे गाळूनी घाम
गावाचा वैरी ठरला, मुखी होते म्हणून जय भीम
आडरानी त्यास गाठून दोरीनं जाम बांधून
आधी हात पाय तोडले अग्नीत दिला फेकून
तो पेटे धडधडा भीमरायाचा बछडा त्या जातीयतेच्या माडा रे
बघ जळतोय मराठवाडा रे
कोणी बनसोड्याची सून दुसऱ्याच्या शेती राबून
अंधार पडता भागून बस चुली पुढ येऊन
तीचवर गावच रिन ती होती फक्त म्हारीन
रूप सौदर्यांची खान जनु गरीबा घरी सोनं
तिचा फोडीला चुडा यो जुलूम केवढा
कोण करेल हा निवाडा रे जळतोय मराठवाडा रे
आम्ही पुण्या - मुंबईची लोक तुम्ही पुण्या - मुंबईची लोक
बस पोकळ आमचा झोक जय भीम जय भीम म्हणतो
गांडुच जीवन जगतो आता यारे सारे आणि एक व्हा रे
आणि जुपा एकीचा गाडा रे जळतोय मराठवाडा
ConversionConversion EmoticonEmoticon