marathisonglyrics

bhint khali kshi? poet suresh bhatt भिंत खचली कशी ? कविता कवि सुरेश भट्ट पुस्तक : एल्गार

भिंत खचली कशी

कवि सुरेश भट्ट 

पुस्तक : एल्गार 


भिंत खचली कशी ? दार फुटले कसे ?

हात बेडयांतूनी आज सूटले कसे ?


बंद आतून तू .. बंद बाहेर तू .. 

माणसांशी तुझे बंद तुटले कसे ? 


हा विकाऊ असा चंद्र नाकार तू 

चांदणे हे तुला सांग पटले कसे ? 


बोललो मी कधी ? ऐकले तू कधी ?

हे महात्म्या तुझे कान किटले कसे ?


राहिलो मी असा हा जसाच्या तसा 

हे शिळे चेहरे मात्र नटले कसे ??


जिवना, तू पुन्हा थाप मारू नको

आसवांचे  जून कर्ज फिटले कसे ?


मी तुम्हाला दिली फक्त साधी शिवी 

रोज आरोप अन् रोज खटले कसे ?


एकमेक किती घ्याल ओवाळूनी .. 

आरतीचे तुम्ही दीप लुटले कसे ?


सभ्य वस्तीत या पाप झाले जिणे 

बोलता मी खरे लोक कटले कसे ?


बोल आतातरी .. बोल काहीतरी.. 

ऐन वेळी तुझे ओठ मिटले कसे ?

  


Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts