माता सावित्रीमाई
माता सावित्रीमाई
होती शिक्षणाची आई ....
माझ्या बोटाले धरुन
मला शाळेत ती नेई ....
नव्हती मुभा कशाचीही
दारं , कुलुपं मनुची ....
म्हणे घरातच बसं
गरज नाही शिक्षणाची ....
दारं तोडणारी आई
माता सावित्री माई ... .
माझ्या बोटाले धरुन
मला शाळेत ती नेई ....
राग मनुचा तिच्यावर
शेण फेके अंगावर ....
का शिकवतेस त्यांचा
हक्क नाही शिक्षणावर ....
सारा राग तो झेलुनं
दिली विद्या भरभरूनं ....
गेली सक्षम करूनं अशी
ती शिक्षणाची आई
माता सावित्री माई ....
माझ्या बोटाले धरुन
मला शाळेत ती नेई ....
या विद्येनेच आली
माझ्या लेखनीला धार ....
आजझाले मी साक्षर
माई तुझे उपकार ....
अशी उब ती मायेची
माझ्या हक्काच्या छायेची ....
कशी विसरु मी माई
तुच शिक्षणाची आई
माता सावित्री माई ....
माझ्या बोटाले धरुन
मला शाळेत ती नेई ....
जय भिम
सुचिता कांबळे
Poem in pdf format
https://drive.google.com/file/d/1kX4iAX6CBzogBv1dFYl44hQRf4gU382r/view?usp=sharing
ConversionConversion EmoticonEmoticon