गाणं : भलभलते सांगतेस ,का उगाच भांडंतेस?
गायक : भीमराव पांचळे
शब्द: मधुसूदन नानिवाडेकर
तू जन्माची भूल तरीही तू माझ्या जगण्याचे कारण
तुझ्याचसाठी माझ्यापाशी केवळ हे गझलेचे तारण
असेल माझे चुकले तेव्हा तोल जायला नकोच होता
कशाच उकरून काढतेस तू नवीन मुद्दे जुनेच भांडण
भलभलते सांगतेस ,का उगाच भांडंतेस?
जन्माचे चुकलेले गणित पुन्हा मांडतेस
सांग कधी मजसाठी चांदण्यात थांबतेस ?
भलभलते सांगतेस ,का उगाच भांडतेस ?
क्षणभर थांबून गडे मोज जूने ओरखडे
घाव नवे त्यावर तू मीठ किती सांडतेस ?
भलभलते सांगतेस, का उगाच भांडतेस ?
हे कबूल मी चुकलो ऐक जरा बाई ग
तेच तेच दळण पुन्हा कांडतेस
भलभलते सांगतेस, का उगाच भांडतेस ?
घरट्यातच रमणारी अबला तू पूर्वीची
आता तू जिद्दीने सागर ओलांडतेस
भलभलते सांगतेस का उगाच भांडतेस ?.
जन्माचे चुकलेले गणित पुन्हा मांडतेस
Download in PDF format
https://drive.google.com/file/d/1Xf8kWB8xMI4wQkZMhA6_3IJ8XC94smLE/view?usp=sharing
ConversionConversion EmoticonEmoticon