पुढचा मार्ग बंद.. लोकनाथ यशवंत कविता
पुस्तक : पुन्हा चाल करूया..
माझे नाकर्तेपण
पुढच्या पिढीवर ढकलतो
अन् अपेक्षा करतो चांगल्या दिवसांची त्यांच्याकडून
अनेक आज्ञानानी मनात भरलेली भीती
डीएनएतूनही दिसते स्पष्ट
आईवडील भीतीनेच वाळले
नकळत त्यांनीच भरली ही दीक्षा मेंदूछ्या मऊ माठात
ती सांभाळता - सांभाळता खूप थकून गेलो
खूपच मागे राहिलो
उडाले दिवस सावरीच्या कापसासारखे तरंगत
बघता बघता
सुमार बुद्धीचे सामान्य लोक
चलाखीने पुढे निघून गेलेत व्यवहारी जगात .
मी भीतीला कवटाळून करीत राहिलो झामलझामल
बंद केले भीतीला मी माझ्यात
दीक्षा दिली नाही चुकूनही मुलांना.
ConversionConversion EmoticonEmoticon