गायक: भिमाराव पांचळे
केले हजार वादे अन पक्षपात केला
अन माझ्याच माणसानी माझाच घात केला
केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी
काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी केली शिकार माझी
गाफील राहिलो मी त्या नेमक्या क्षणाला
मागून वार केले माझ्याच माणसांनी
केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी
घर विसकटून माझे घर बांधले तुझे तू
बस येवढीच आहे माझी तुझी कहाणी
केली शिकार माझी
मी बोललोच नव्हतो माझ्या व्यथा कुठेही
सांगून टाकल्या पण माझ्याच आसावानी
केली शिकार माझी माझ्याच सदगुणांनी
केली शिकार माझी इतक्या अनुभवांनी
समृद्ध मीच झालो उपकार हेच केले
दिलदार संकटांनी ????????
केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी
काटे कुठेच नव्हते केला दगा फुलांनी केली शिकार माझी
ConversionConversion EmoticonEmoticon