बेंबीचा देठ ओला होणा-या वयात
गोलपिठा : पद्मश्री नावेदव लक्ष्मण ढसाळ
विद्रोही विचार, कविता
बेंबीचा देठ ओला होणा-या वयात
तुझ्या कुकर्माची महाकाव्ये बलात्कार करुन अड्डया-अड्डयावर जेव्हा तू घोकून घेतलीस तेव्हा कळले की
तु फक्त देवदेवळेच जोपासलीस
दिशादिशांचे दरवाजे ठोठावणा-या तुझी कीर्ती साता समुद्रापलीकडे
नेणा-या
बुद्धाची प्रतिमा तु छिन्नविच्छिन्न
केलीस माणसालाच दिस केलीस
पाखंडी मनूला-माणसिच्या शत्रुला तू डोक्यावर घेतलेस
गीतेचे गरळ प्राशून तू रोम रोम बांडगूळ केलेस
माणसालाच माणसाची हागीमूती काढायला लावलेस
ज्यांच्या रक्तमासावर तुझा पिंड पोसला
त्या महात्म्यांना
सडवून तू महाभारत घडविलेस
उद्धारकर्त्याच् गळ्यात मडकी अडकविलीस ढुंगणाला बोराट्याची फांदी बांधलीस
संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला वेशीबाहेर काढलेस
बारा महिने तेरा काळ कढत ठेवलेस,रडत ठेवलेस,सडत ठेवलेस
हे वाद्या!तू माणसालाच असे हीन केलेस
तुला वेशीबाहेरला
आक्रोश ऐकू आला नाही का?
पेटलेला माणूस दिसला नाही का?
उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्शला नाही का? विजेचा लोळ वेशीची तटबंदी फोडून आत येतोय रे?
सांग का देत नाहीस त्याला कडकडून मायेचे आलिंगन? का तोडून टाकत नाहीस शतकानुशतकाचे काटेरी कुंपण?
ज्याने तुला आपले सर्वस्व दिले.
ConversionConversion EmoticonEmoticon