माळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पाणी जातं
गीत -
योगेश
संगीत - आनंदघन, स्वर-लता मंगेशकर
चित्रपट - साधी माणस
दिग्दर्शक - बालाजी पेंढारकर
माळ्याच्या
मळ्यामंदी पाटाच पाणी जातं
गुलाब, जाई-जुई,
मोगरा फुलवीतं
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पाणी जातं
दादाच्या मळ्यामंदी मोटंचं मोटं पानी
पाजिते रान सारं मायेची वयनी
हसत डुलत मोत्याचं पिक येतं
लाडकी लेक राजाचा ल्योक
लगीन माझ्या चिमणीच
सावळा बंधुराया, साजिरी वयनीबाई
गोजिरी शिरपा हंसा म्हायेरी माझ्या हाय
वाटंनं म्हयेराच्या धावत मन जातं
गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी ग
राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी जिवाचं लिंबलोनं
मायेला पूर येतो, पारूच मन जातं
ConversionConversion EmoticonEmoticon