marathisonglyrics

GODHAL | वंचित बहुजनांचा गोंधळ | MILIND SHINDE | SHITAL SATHE | SACHIN MALI #गोंधळ #बहुजन #GONDHAL - Milind Shinde & Shital Sathe Lyrics

वंचित बहुजनांचा गोंधळ

Singer Milind Shinde & Shital Sathe
Music Milind Shinde & Shital Sathe
Song Writer Sachin Mali & Shital Sathe

पंढरीच्या विठूराया जागराला यावं
संतश्रेष्ठ नामदेवा जागराला यावं
जगतगुरू तुकोबाराया जागराला यावं
जिजाऊ माँसाहेब तुम्ही जागराला यावं
छत्रपती शिवराया जागराला यावं
जागर मांडला तुम्ही जागराला यावं

क्रांतीसूर्य जोतीबाराया जागराला यावं
ज्ञानमाता सावित्रीमाई जागराला यावं
प्रज्ञासूर्य बाबासाहेब जागराला यावं
लोकशाहीर अण्णाभाऊ जागराला यावं
लोकशाहीर वामनदादा जागराला यावं
जागर मांडला तुम्ही जगराला यावं

दार उघडू दे आता दार उघडू दे
दार उघडू दे आता दार उघडू दे

वंचितांना सत्तेचं दार उघडू दे
धनगरांना सत्तेचं दार उघडू दे

ओबीसींना सत्तेचं दार उघडू दे
भटक्यांना सत्तेचं दार उघडू दे

साळ्याला-माळ्याला दार उघडू दे
आग्ऱ्याला-कोळ्याला दार उघडू दे

चांभाराला-कुंभाराला दार उघडू दे
लोहाराला-सुताराला दार उघडू दे

न्हाव्याला-शिंप्याला दार उघडू दे
कुणब्याला-कोष्ट्याला दार उघडू दे

आयांना-बायांना दार उघडू दे
किन्नर तायांना दार उघडू दे

दार उघडू दे आता दार उघडू दे
वंचितांना सत्तेचं दार उघडू दे

पेंढाऱ्याला-भंडाऱ्याला दार उघडू दे
वंजाऱ्याला-पिंजाऱ्याला दार उघडू दे

लोहाराला-होलाराला दार उघडू दे
घिसाड्याला-कैकाड्याला दार उघडू दे

तेल्याला-तांबोळ्याला दार उघडू दे
गारूड्याला-कऱ्हाड्याला दार उघडू दे

मांगाला-भंग्याला दार उघडू दे
हेळव्याला-पिंगळ्याला दार उघडू दे

दार उघडू दे आता दार उघडू दे
वंचितांना सत्तेचं दार उघडू दे

बहुजनांचा गोंधळ वाजे तालावर संबळ
आणा काठी अन घोंगडं
कष्टकऱ्यांची सांगड
आली लोक लय मैदाळ
बारा बलुत्यांची ओंजळ
अठरा अलुत्यांची कांबळ वाजं तालावर संबळ

विणली वंचितांची माळ
एकजुटीचा हा काळ
उठली रणामंदी राळ
दौडू नगा आता येळ
आमचं कष्टकऱ्यांचं नातं
उच-नीच नाही मानत
भेदभाव हा भोंगळ
जाणा ऐकीचं हे बळ
बहुजनांचा गोंधळ वाजं तालावर संबळ

बाळासाहेबानं जोडला बहुजन
अन घेतला सत्तेचा पण
बाळासाहेबानं फुंकलया रणशिंग
भाजप काँग्रेसचं फुटलया बिंग
पाठ भिंतीला लावून लढायचा पिंड
आजवर एकाकी लढवली ही खिंड
आले साथीला पहिल्यांदा धनगर
वाटली भटक्यांनी ऐकीची साखर
ऐकी मांगाची देतीया ललकार
बाळासाहेबांच्या शब्दाची ही धार

अहो कसा हाय आमचा नेता

त्याचा पोलादाचा पिळ
त्याला दहा हत्तीचं बळ
सत्ता खोट्यांची डळमळ
जाना ऐकीच हे बळ
बहुजनांचा गोंधळ वाजं तालावर संबळ

गाडायला चला आता गाडायला चला
मनुवाद्यांना गाडायला चला
पाडायला चला आता पाडायला चला
प्रस्थापितांना पाडायला चला

मताला चला आता मताला चला
मताला चला आता मताला चला

पिढ्यानपिढ्या घराणेशाहीची सत्ता
गिरवत बसली यांचाच कित्ता
राजा येवू द्या मताच्या पेटीतून आता
घडवू नव्या महाराष्ट्राची गाथा

दार उघडू दे आता दार उघडू दे
वंचितांना सत्तेचं दार उघडू दे

फिटर वेटर मताला चला
वेल्डर पेंटर मताला चला
ड्रायव्हर कंडक्टर मताला चला
मजुर कामगार मताला चला
शेतकरी कातकरी मताला चला
गावकरी कामकरी मताला चला

मताला चला आता मताला चला

आता ताब्यात घ्यायचं विधी मंडळ
आवंदा लढाई होणार तुंबळ
वाजवू सत्तेचा संबळ, बहुजनांचा गोंधळ
वाजवू सत्तेचा संबळ, बहुजनांचा गोंधळ

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts