ते खूपच अस्वस्थ झाले आहेत .
आयुष्याच्या संध्याकाळी
माणसं जोडायला निघाले आहेत.
पैसा मालमत्ता करता करता
आयुष्य संपून गेले
माणसं तोडता - तोडता वय निघून गेले
चार खांद्यांची जाणीव होताच
पोटात मोठा गोळा उठला आहे.
आता ते माणसे कामवायला निघाले आहेत.
विशाल, सुंदर जग लोटून
कलेसाठी कला, कलेसाठी जीवन
असलं काहीतरीच ते जीवनव्रत जगायचे
अंधाऱ्या आत्मकेंद्री पोकळीत रमायचे
चार खांद्याच्या नागफण्या उंचवताच
ते माणसं बघायला निघाले आहेत.
मनाच्या या भ्रमात
त्यांना दिसतो कधी खड्डा ,
कधी सरण, तर कधी तांबूत !
असल्या भ्रमिष्ट असवस्थेत
ते चार माणसं जोडायला निघाले आहेत.
दात गमावलेल्या अस्तवेळी ते स्मित करायला लागलेत
अन् आता ते चार खांदे शोधायला लागलेत.
ConversionConversion EmoticonEmoticon