Shivrahya Abhishek Lyrics
Singer | Neelambari Kirkire, Vivek Naik, Amitraj, Deepali Desai, Jiya Suresh Wadkar, Gaurav Chati & Santosh Bote |
Music | Amitraj |
Song Writer | Kavibhushan and Sandeep Khare |
पहिली माझी ओवी गं
माझ्या जिजाभवानी ला
जिणं दिस दाखविला सोनियाचा
दुसरी माझी ओवी गं
माझा शिवबा ऐकेल
राज पृथ्वीचे करेल बाळ माझा
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् ।
शंभो…
स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङुलम् ॥
शंभो…
सक्र जिमी सैल पर । अर्क तम फैल पर ।
बिघन कि रैल पर । लम्बोदर देखिये ।
राम दशकंध पर । भीम जरासंध पर ।
भूषण जो सिन्धु पर । कुम्भज बिसेखीये ।
हर जो अनंग पर । गरुड ज्यो भुजंग पर ।
कौरव के अन्ग पर । पार्थ जो पेखीये ।
बाज ज्यो बिहंग पर । सिंह ज्यो मतंग पर ।
म्लेंछ चतुरंग पर । शिवराज देखिये ।
ऐका ऐका मराठी मर्दानों
ऐका ऐका माय लेकीनों
ऐका ऐका चंद्र सूर्यानों
पळत्या वाऱ्यानों रानकिल्यानों
जी… जी…
हे ऐका ऐका सात समिन्द्रानो
जी… जी…
ऐका ऐका असली नवलाई
किती जन्मात घडली नाही
बादशाही पडे पायाशी
जी… जी…
छाताडावर नाचे शिवशाही रं
जी… जी…
आज मातीला सूर्य लाभला
शिव सुंदर केशरी
आज आमचा राजा बसला
तख्त मराठी वरी
युगायुगांची पुण्याई
येई उतरून भूमी वरी
आज आमचा राजा बसला
तख्तमराठी वरी
होत कोरड आभाळ
समदा दुष्काळ दुष्काळ
माती होती लय तान्हेली
रया शेताची हो गेली
हाक पोहचली भवानी आईला
राया पावसावाणी हो कोसळला
सुगी झाली पिक पाण्याची
सुगी झाली अवघ्या जन्माची
एकच राजा असा खाय जो
कुणब्या घरी भाकरी
आज आमचा राजा बसला
तख्त मराठी वरी
मौला मौला
हर बशर का ख्वाब है तू
तू खुदा का नूर है
हस्ती सुरज सी तेरी
हर तारिकी से दूर है
रेहेनुमाई के तेरे चर्चे
गजब जन्नत में है
इस जमि ने फुल्दसे
मांगा तुझे मन्नत में है
राजा माझा इक विरूबा चा हो
राया माझा अवतार खंडेराया चा हो
उरामंदी राजा माझा
डोयामंदी राजा माझा
जीवामंदी मनामंदी
राजा ठसला
माझा धनी माझा राया
बापावानी करी माया
गडावर आज माझा
राजा बसला
जय राम कृष्ण हरी
जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण राम कृष्ण
राम कृष्ण हरी
छाती केसरीची दृष्टी गरुडाची
गती हरणाची ऐसा राजा
देह राजीयाचा प्राण योगीयाचा
मूळ कैलासाचे ऐसा राजा
माती साठी प्राण सांडतो
युद्ध मांडीतो ऐसा राजा
जीव वाहतो जीव लावतो
जीव रक्षितो ऐसा राजा
ConversionConversion EmoticonEmoticon