तू नभातले तारे - भीमराव पांचाळे Lyrics

Singer | भीमराव पांचाळे |
Music | भीमराव पांचाळे |
Song Writer | भीमराव पांचाळे |
तू नभातले तारे माळलेस का तेव्हा?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?
आज का तुला माझे एवढे रडू आले?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा?
हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले..
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा?
चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकान्ती;
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा?
ConversionConversion EmoticonEmoticon