marathisonglyrics

अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा - भीमराव पांचाळे Lyrics

 

अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा - भीमराव पांचाळे Lyrics

Singer भीमराव पांचाळे
Music भीमराव पांचाळे
Song Writer इलाही जमादार

वाचलेली, ऐकलेली माणसे, गेली कुठे
पुस्तकांतून पाहिलेली माणसे, गेली कुठे
रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो
आरश्यावरती आता ...
आरश्याला भावलेली माणसे, गेली कुठे

अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा
अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा

काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली
डोळ्यांत वेदनेचा माझ्या झरा असावा
अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा

जख्मा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा
अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा

माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही
दाही दिशा कशाच्या, हा पिंजरा असावा





Previous
Next Post »

Popular Posts