पावसात भिजलेली- प्रवीण डोणे/प्रितेश मांजलकर

Singer | प्रवीण डोणे |
Music | प्रितेश मांजलकर |
Song Writer | प्रितेश मांजलकर |
पावसात भिजलेली लख्ख लख्ख न्हालेली,
एक तरुणी जात होती,
कमनीय तिची काया ,अवघे तारुण्य वाया,
गोड गोड हसून गात होती
ती प्रेम दिवानी,माझ्या स्वप्नांची राणी || धृ ||
अंग अंग चिंब चिंब मोह डोह मनमोहक
श्वासांची लय वाढे स्तब्ध करती गतिरोधक
काय जादू झाली हृदय केले हवाली
एक तीच सर्वदूर ना कोणी भवताली
अंग अंग चिंब चिंब मोह डोह मनमोहक
श्वासांची लय वाढे स्तब्ध करती गतिरोधक
नयन बाण आला,चंद्र घायाळ झाला
दंगल गुलाबी काळजात होती,
कमनीय तिची काया ,अवघे तारुण्य वाया,
लाडे लाडे हसून पहात होती
पुरता दिवाना झालो तिच्या मागे कुठवर आलो ||१||
अंदाधुंद, प्रेमबंध , बांधू सये सत्वर
समीप ये ना मिठीत घे ना वाढू दे प्रेमज्वर
अशी कवेत यावी,दोन शरीरं विरघळावी,
नात्याची घट्ट वीण ना कधी उसवावी
अंदाधुंद, प्रेमबंध , बांधू सये सत्वर
समीप ये ना मिठीत घे ना वाढू दे प्रेमज्वर
स्वप्न परी आली जणू स्वर्गातून खाली
प्रतिमा अशीच हृदयात होती
कमनीय तिची काया ,अवघे तारुण्य वाया,
गोड गोड हसून गात होती...
पुरता बेभान झालो ,तिच्या प्रेमात चिंब चिंब न्हालो || २ ||
ConversionConversion EmoticonEmoticon