या रिमझिम पावसात - प्रविण डोणे - प्रणित उन्हाळेकर
गायक | प्रविण डोणे |
संगीत | प्रविण डोणे-जयेंद्र भांडे |
गीतकार | प्रणित उन्हाळेकर |
कलाकार : रंजना म्हाब्दी,अपूर्व शिंदे,धोंडू मांजलकर,संदेश लोकेगावकर,अक्षय मुटाटकर
सहकलाकार-इशिका वालकर,सौरभ पवार,उमेश वालकर, अनिकेत उहाळेकर,अमर उहाळेकर ,चंद्रकांत मांंजलकर ,सुलोचना मांजलकर,सौरभ उन्हाळेकर,बंटी वालकर
या रिमझिम पावसात
या रिमझिम पावसात आज ओलं चिंब व्हायचंय
मनामनात दडलेली गाणी बेधुंद होऊन गायचंय || धृ ||
पावसाच्या पहिल्या थेंबांनी,मातीचा मंद सुगंध येतोय,
त्या तृप्त सुवासाने , अतृप्त श्वास ही धुंद होतोय,
तुझ्या श्वासात,त्या ध्यासात मला हरवून जायचंय || १ ||
चिंब चिंब भिजताना मज वाटे तुझ्या समीप हळूच यावे,
आणि नकळत मी तुला हा चिंब माझ्या कवेत घ्यावे,
तुला शहारताना,मग लाजताना मला जवळून पहायचंय || २ ||
या रिमझिम पावसात आज ओलं चिंब व्हायचंय
मनामनात दडलेली गाणी बेधुंद होऊन गायचंय...
ConversionConversion EmoticonEmoticon