marathisonglyrics

Maza Sanvidhan, Maza Sanman lyrics| Pravin Done| Prashant Kadam | - Pravin Done Lyrics माझं संविधान.... माझा सन्मान....

                                         माझं संविधान.... माझा सन्मान....

Singer Pravin Done
Composer       Pravin - Pritesh 
Music Pravin Pritesh
Song Writer Pritesh Manjalkar
Video Directors  Prashant Kadam 

तुझ्या मुळे भरारी घेतो दुर्बल आणि झुकतो पंतप्रधान
आमचा मान ,आमची शान, आमचा प्राण संविधान
इतिहास तपासा तुम्ही आहे कुणाचं हो योगदान
घटनेच्या त्या तज्ज्ञाने केलं तुम्हा आम्हा धनवान
दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस परिश्रमाने कोरलं सोनेरी पान..
दिला कणा बहुजना जगतात ताठ मानेनं माझं संविधान माझा सन्मान || धृ ||
कोरस -: थयथय नाचत होता ललाटी क्रूर मनू हैवान
दुर्बल इथला बहुजन बनला सबल आणि बलवान
माझं संविधान.... माझा सन्मान....
साराच भारत घडविला तरी कैवारी तो दलितांचा
कृतघ्नपणा काय वर्णू मी इथल्या शोषितांचा
एका मताला एकच मुल्य समतेचं हे मतदान
||१|| कोरस - इथे लोकशाहीची लगाम दिली सामान्यांच्या हाती
आम्ही भारताचे लोकच मालक क्रांती किती ही महान
जीर्ण रुढींच्या बंधनात हो स्त्रियांना कोंडून ठेवलं
हिंदू कोड बिल मांडून त्यांना गुलामी मुक्त केलं
दर्जाची संधीची समानता महिलांना ठरली वरदान
||२|| कोरस:- मनूचा तुरूंग तोडून दिलं महिलांना मुक्त आकाश
व्यक्ती स्वातंत्र्य देऊन गेलं स्त्रियांना स्वत्व नी भान
स्वातंत्र्य, समता, बंधुता आचरली हो मनानं
भारतीयत्वाची भावना जोपासू सारेच प्राणपणानं
विषमतेला थारा नको इथे पुसूया नामोनिशाण
||३|| कोरस:- जातीपातीने तुकडे केले भारताचे बघा आजवर समतेची गोड पहाट उजडेल सम्यक आचरणानं





ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv

Popular Posts