चित्रपट: जैत रे जैत
गायक : आशा भोसले , रवींद्र साठे
दिग्दर्शक : जुबार पटेल
गीत : ना .धों . मनोहर
संगीत : पं .हृदयनाथ मंगेशकर
कलाकार : मोहन आगाशे , स्मिता पाटील , निळू फुले , सुलभा देशपांडे , बाल कर्वे
जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी
येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी
समिन्द्राचं भरलं गानं, उधानवारं आलं जी
येड्यापिस्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी
मोडुन गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी
चोचीमंदी चोच टाकुनी, दानं उष्टं झालं जी
जांभुळीच्या झाडाखाली, कोयडं बोल बोलं जी
जांभळीचं बन थोडं, पिकून पिवळं झालं जी
ConversionConversion EmoticonEmoticon